लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मोशीत स्वतंत्र सबस्टेशन न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

बीज पुरवठा अत्यंत विस्कळीत स्वरूपाचा व कमी पडत आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी

मोशी येथील विदयुत पुरवठा वारंवार खंडित होत असून मोशी गावाकरिता स्वतंत्र सबस्टेशन करावे यासाठी मा.नगरसेवक.श्री.धनंजयभाऊ आल्हाट यांनी भोसरीतील विदयुत विभागात निवेदन दिले.

निवेदनात धनंजयभाऊ आल्हाट म्हंटले आहे कि, मोशी शहर व आजूबाजूचा परिसर हा अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर गृहप्रकल्प व बैठी घरे वाढत आहेत परंतु या ठिकाणी होणारा बीज पुरवठा अत्यंत विस्कळीत स्वरूपाचा व कमी पडत आहे.

त्यामुळे येथील नागरिक लघुउदयोजक छोटे व्यवसायिक दुकानदार अत्यंत त्रस्त झालेले असून त्यांच्याकडून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त होत आहे व शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत असल्या कारणाने शालेय विद्यार्थ्यांचे यात अतोनात नुकसान होत आहे. याबाबत माझ्याकडे लोकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. येथे होणारा वीज पुरवठा दर तासाला विस्कळीत होत असून संबंधित अधिकारी व वायरमन नागरिकांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत.

संबंधितांकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या परिस्थितीस जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तरी सदर परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व गृहप्रकल्प लक्षात घेऊन स्वतंत्र सबस्टेशन करण्यात यावे. सदर तक्रारींची दखल न घेतल्यास शिवसेनेच्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असं इशारा देखील धनंजयभाऊ आल्हाट यांनी दिला आहे.

यावेळी मा.नगरसेवक.श्री.धनंजयभाऊ आल्हाट, शाखाप्रमुख योगेश बोराटे, संतोष बोराटे, मोरेश्वर आल्हाट, प्रसाद आल्हाट व कार्यकर्ते उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani