प्रसिद्ध गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना शनैश्वर कृतज्ञता गोरक्षा पुरस्कार जाहीर
काल प्रसिद्ध गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना शनैश्वर कृतज्ञता गोरक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आला. शनैश्वर संस्थान सोळाशी ता – कोरेगांव जिल्हा सातारा येथे अनंत विभूषित जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते यावर्षीचा शनैश्वर गोरक्षा कृतज्ञता पुरस्कार प्रदान शिवशंकर स्वामी यांना करण्यात आला.

लोकवार्ता : काल प्रसिद्ध गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना शनैश्वर कृतज्ञता गोरक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आला. शनैश्वर संस्थान सोळाशी ता – कोरेगांव जिल्हा सातारा येथे अनंत विभूषित जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते यावर्षीचा शनैश्वर गोरक्षा कृतज्ञता पुरस्कार प्रदान शिवशंकर स्वामी यांना करण्यात आला. हा पुरस्कार २०१३ साली उत्तरप्रदेशचे माननीय मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथजी यांना प्रदान करण्यात आला होता.
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी आजपर्यंत केलेल्या गोरक्षणाच्या कामाची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. याप्रसंगी, ”हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावून गायीच्या रक्षणासाठी दिवस-रात्र तत्पर असणारे गोरक्षक बांधव , गोरक्षणाच्या कार्यात नेहमी सहकार्य देणारे माझे सर्व पोलीस बांधव, न्यायालयामध्ये गाईची सक्षमपणे बाजू मांडणारे माझे सर्व वकील बांधव व समाजामध्ये गोरक्षणाचे कार्य पोहोचवणारे माझे सर्व पत्रकार बांधव , तसेच वेळोवेळी जे मला या कार्यासाठी मदत करतात यांना मी माझा पुरस्कार समर्पित करत आहे.” असं शिवशंकर स्वामी म्हणाले.