पुणे- नगर मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस ”शिवाई”…
लोकवार्ता : पुणे-नगर-पुणे अशी शिवाई ही इलेक्ट्रिक बस सेवा चालू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

लोकवार्ता : पुणे-नगर-पुणे अशी शिवाई ही इलेक्ट्रिक बस सेवा चालू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. १ जून २०२२ रोजी एसटी महामंडळ आपल्या अमृतमोहस्तवी वर्षात प्रदार्पण करणार आहे. याच औचित्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले. एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण कवटे यांनी या बसला हिरवा कंदील दाखवला. पुण्यातील विभागीय कार्यालयातील ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून शिवाई नगरला रवाना झाली. प्रवाशांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला.
या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू अशी आसन व्यवस्था आहे. ए कून ४३ आसने आहेत. या बसमुळे प्रदूषण होणार नाही असं ही सांगण्यात येत आहे. ही बस वातानुकूलित आहे. बसचा तशी वेग ८० किलोमीटर असून एकदा चार्ज केल्यानंतर ३०० किलोमीटर प्रवास करण्याची या बस ची क्षमता आहे.