शिवबा प्रतिष्ठान व अक्षय माछरे फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात..!
लोकवार्ता : काल भाटनगर येथील शिवबा प्रतिष्ठान आणि अक्षय माछरे फाउंडेशन यांच्या वतीने नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात करण्यात आली. गेली दोन वर्ष कोरोनामुळे सण-उत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. मात्र यावर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात नवरात्रोस्तव साजरा करण्यात येत आहे.
भाटनगर येथे काल घटस्थापनेच्या दिवशी सकाळी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, यावेळी आयोजित पूजेसाठी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. त्याचबरोबर सायंकाळी देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती, आकर्षक विद्युत रोषणाई, आणि नयनरम्य भव्य देखाव्यासह देवीचे मुख दर्शन पार पडले, यावेळी अगदी दिमाखदार पद्धतीने देवीचे स्वागत करण्यात आले.. मोठ्या भक्तिभावात देवीचा आगमन सोहळा पार पडला. याप्रसंगी देवीच्या गाण्यांवर भक्तांनी ताल धरला. स्थापना झाल्यांनतर मनाची पहिली सामूहिक आरती घेण्यात आली. देवीच्या नामघोषात संपूर्ण भाटनगर परिसर दुमदुमला होता.
या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष अमोल रावळकर, आधारस्तंभ अक्षय मनोज माछरे, जेष्ठ सल्लागार मुरचंद भाट, मनोज माछरे, सुभाष माछरे, जतन बागडे, प्रकाश रावळकर, सल्लागार समिती, अजबसिंग तामचीकर, सचिन तिडेकर, अशोक तामचीकर, प्रकाश बागडे, विशाल भाट, बलराम कराळे, विकास मलके,दशरथ मलकेकर, शैलेन्द्र राजपूत, राजतिलक माछरे, राहूल गागडे, विशाल तामचीकर, सुरज माछरे, सावन रावळकर ,किरण माछरे, राजू तामचीकर, आतिश मलकेकर, निलेश मलके, आकाश भाट, भारत मलके, विशेष तामचीकर यांनी केले.