लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

शिवरोडवरील रखडलेल्या कामाला गती ; आमदार महेश लांडगे यांनी जाग्यावरच काढला अनेक समस्यांचा निकाल

लोकवार्ता : आज चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून चिखली – मोशी परिसरातील विजेच्या समस्या बाबत आमदार महेश लांडगे आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी, परिसरातील सोसायटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खालील विषय व समस्यावर चर्चा करून लगेच जाग्यावर समस्या निकाली काढण्यात आल्या.

1) क्रिस्टल सीटी सोसायटीची वीज समस्या-
या सोसायटीची लाईट रोज दिवसातून 2 ते 3 तास लाईट जात होती. यावर आमदार महेश यांनी महावितरण अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि फक्त दोन तासात यावर महावितरण कडून तोडगा काढण्यात आला. क्रिस्टल सीटी सोसायटीला दुसऱ्या ठिकानाहून वीज जोडणी करून देण्यात आली. आता यापुढे या सोसायटीला पूर्वीप्रमाणे सतत वीज जाण्याची समस्या उदभवणार नाही, हा प्रश्न निकाली काढण्यात आला

2) क्रिस्टल सीटी समोरील शिवरोडच्या रखडलेल्या कामाबाबत-
क्रिस्टल सीटी सोसायटी समोरील देहू -आळंदी रोड पासून स्वराज कॅपिटल सोसायटी पर्यंतच्या रोडचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते. त्यामुळे या परिसरातील 20 मोठ्या सोसायट्यामधील सदस्यांना, महिला भगिनींना प्रवास करताना त्रास होत होता. ही गोष्ट सोसायट्यामधील महिला भगिनींनी आमदार महेश दादांच्या समोर मांडली. यावर महेशदादांनी ऑन द स्पॉट पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी, ठेकेदार, सन्माननीय शेतकरी बांधव यांना बोलवून घेऊन मिटिंग घेऊन सर्व विषय निकाली काढले व रोडचे काम ऑन द स्पॉट सर्जिकल स्ट्राईक करून चालू केले. पुढील दोन चार दिवसात रोडचे काम पूर्ण होऊन सोसायटी सदस्यांना या रोडचा वापर करता येईल.

3) ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या पाठीमागील रोड या रोडची स्वतः आमदार लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी केली व या रोडचे काम चालू करण्याचे आदेश दिले. उद्यापासून या रोडचे देखील काम चालू होईल.

4) परिसरातील सोसायट्या, बैठी घरे यांच्या सतत जाणाऱ्या विजेच्या समस्या बाबत चिखली-मोशी-जाधववाडी -बोऱ्हाडेवाडी या परीरातील वीज सतत जाते, त्यामुळे याचा लोकांना खूप त्रास होतो. याचे गाऱ्हाणे लोकांनी दादांच्या समोर मांडल्यावर यावर काम करण्याचे आदेश आदरणीय आमदार महेशदादांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले, त्यावर तात्कळ सर्व मेंटेनन्सची काम करून ही समस्या सोडवण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटिंगमध्ये अश्वस्थ केले व येथून पुढे लाईट जाणार नाही व लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले.

5) शिवाजीवाडी येथील गुरुदत्त कॉलनी मधील सोसायट्या व बैठ्या घरांच्या पाणी समस्या बाबत यावर लवकर तोडगा काढण्याचे आदेश आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री टकले यांना दिले. यावर काम चालू असून लवकर ही समस्या मार्गी लागेल असे श्री टकले यांनी सांगितले.

मीटिंगमध्ये आदरणीय आमदार महेशदादा यांनी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, ”मागील अडीच वर्ष राज्यपातळीवर आपली सत्ता नसल्याने आपल्या विकास कामना थोडी खीळ बसली होती, ती सुदैवाने राज्यत आता आपली सत्ता आली असल्याने रखडलेली सर्व काम आता पूर्ण जोमाने करून पूर्ण केली जातील, प्रत्येक सोसायटीमधील प्रत्येक सदस्य हा मी माझ्या परिवारातील समजतो, त्यामुळे कोणत्याही सोसायटीमधील माताभगिनीची, पुरुष बांधवांची कोणतीही समस्या असेल ती माझ्याकडून सोडवली जाईल. मागील 7 वर्षांपासून आपल्या चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून आलेली प्रत्येक समस्या मी प्रामाणिकपणे सोडवलेली आहे. व पुढे देखील आपली प्रत्येक समस्या, प्रश्न नक्की सोडवले जातील याची ग्वाही देतो.” तसेच चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नोव्हेंबर 2022 मध्ये मिळणारे पाणी पिंपरी चिंचवड मनपात प्रशासन असल्याने व राज्यात वेगळी सत्ता असल्याने मिळाले नाही, ते आता लवकरच मिळेल व आपल्या सर्व समाविष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, अशी बरीच रखडलेली विकास काम आता पूर्ण होतील,

पुढे शुभारंभ सोसायटी जाधवाडी चे चेरमन बाबासाहेब पाटील मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, ”जनतेच्या एवढ्या संपर्कात राहणारे, नागरिकांना सहज उपलब्द होणारे, सोसायटी असो किंवा इतर नागरिक असो यांच्या छोट्या छोट्या समस्येमध्ये मदत करणारे आमदार मी माझ्या 78 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिले नाहीत, इतर आमदारांना भेटण्यासाठी आगाऊ वेळ घेऊन देखील तासोन्तास ताटकळत बसावे लागते पण आमदार महेश दादा लोकांना सहज उपलब्द होतात, असे आमदार आपल्याला मिळणे हे आपले भाग्य आहे.”

या बैठकीत सीटी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री.शार्दूल सावंत यांनी आभार मांडताना म्हटले कि, ”या अगोदर काही दिवसांपूर्वी आपल्या चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून आदरणीय आमदार महेशदादांच्या उपस्थितीत आमच्या सोसायटीच्या बिल्डर बरोबर मिटिंग घेतली होती. त्या मिटिंगमध्ये दादांनी बिल्डरला सांगितलेली सर्व काम बिल्डरनी करून दिली.तसेच आमच्या सोसायटीची कन्व्हिन्स डिड देखील बिल्डरने करून दिली. त्याबद्दल आदरणीय दादा व फेडरेशनचे खूप खूप आभार.”

या बैठकीत फेडरेशनचे अध्यक्ष- श्री. संजीवन सांगळे, सचिव- श्री. प्रकाश जुकंटवार, उपाधयक्ष-लक्ष्मीमंत बोन्डे, उपाध्यक्ष श्री.धीरज सिंग, उपाध्यक्ष -अमोल बांगर, माजी महापौर श्री.राहुलदादा जाधव,माजी नगरसेविका सौ. सारिकताई बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, क्रिस्टल सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, तसेच परिसरातील सोसायट्यांचे चेअरमन व पदाधिकारी, सोसायटी सदस्य, तसेच महावितरण चे अधिकारी श्री.कवडे, श्री, सूळ,पिंपरी चिंचवड मनपा पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टकले, पाणीपुरवठा अधिकारी श्री. पाठक, श्री ईदे, स्थापत्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani