“कर्नाटक घटनेवर शिवसैनिकांचा संताप, शिवाजी पार्क मध्ये आंदोलन”
-कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट.
मुंबई।लोकवार्ता-
कर्नाटकच्या घटनेचे पडसाद आता मुंबईतील दादर परिसरातही पडू लागले आहेत. शिवसैनिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.

सदा सरवणकर, मनीषा कायंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासोबत अनेक शिवसैनिक याठिकाणी उपस्थित आहेत. कर्नाटकातील घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे शिवाजी पार्क मध्ये दाखल झाले आहेत.
माँसाहेब यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे.यासोबतच शिवसेनेकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवसेने बरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे ने देखील संताप व्यक्त केला आहे.महाराषट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही अशी तीव्र भावना शिवप्रेमीं कडून व्यक्त केली जात आहे.दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्रभरातून केली जात आहे.