रूपालीताई आल्हाट यांना निवडुन द्या त्यांच्याकडुन काम करून घेन्याची जबाबदारी माझी
पिंपरी।लोकवार्ता
दि. २४/१०/२०२१ रोजी मोशी परिसरातील जेष्ठ नागरिक संघ व मोशी परिसरातील जेष्ठ नागरीक यांच्यासाठी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी आयोजित केले होते. त्या सहलिला तब्बल २०० हून अधिक जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.त्या नंतर जेष्ठ नागरिकांचा सन्मान मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलत असताना आढळराव पाटील म्हनाले ,” मी गेली १० १५ वर्षापासून या आल्हाट दांम्पत्यास ओळखतो मागिल पिंपरी- चिंचवड सार्वत्रीक निवडणुक २०१७ ला सौ.रूपाली आल्हाट उमेदवार होत्या त्यांना त्या निवडणुकीत अवघ्या ४७ मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्या पराभवाला न डगमगता निकालाच्या दुसर्याच दिवशी हे दांम्पत्य नागरिकांच्या सेवेस रूजु झाले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवतां दरमहा २१०० कुटुंबाला स्व खर्चाने राशन वाटपाचे काम हे दांम्पत्य करत आहे.

येत्या पिंपरी- चिंचवड सार्वत्रीक निवडणुक २०२२ मध्ये आपण सौ. रूपाली किंवा श्री परशुराम या दोघांपैकी एकाला विजयी कौल द्या व त्या नंतर त्यांच्याकडुन काम करून घेन्याची जबाबदारी माझी राहील .”अश्याप्रकारे विधान करून शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी सौ. किंवा श्री आल्हाट यांची उमेदवारी नकळत पणे जाहीर केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. महाविकासआघाटी होईल का नाही हे माहीत नाही परंतु आढळराव पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रथम श्री व सौ आल्हाट यांची उमेदवारी जाहीर करून आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बानखिले,शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरून गिरे, जेष्ठ नागरीक संघ मोशी चे अध्यक्ष श्री.मनोहर वेलनकर, देशमुख काका , चौधरी काका , कुलकर्णी काका, निकम काका, संदीप तांदळे, अशोक गायकवाड, नितीन लगाडे इ. उपस्थित होते.