धक्कादायक ! पुणे मेट्रो काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू
-५० फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.
पुणे । लोकवार्ता-
पुण्यात मेट्रोचे काम चालू असताना घडली एक दुर्दैवी घटना.मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात कामगाराला प्राण गमवावे लागले. 50 फूट उंचीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. पुणे शहरात पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. मूलचंद्र कुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो मूळ उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला. पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ रविवार 15 मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघातात मूलचंद्र कुमार सीताराम याला जीव गमवावा लागला. मूलचंद्र कुमार हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला होता.