श्रुती गावडे यांच्या अनोख्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
लोकवार्ता
पुण्यातील श्रुती गावडे या मुलीनं एक अनोखा विक्रम केला. शिवजयंतीला १ लाख ११ हजार वेळा जाणता राजा हा शब्द मोडी लिपीत लिहून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ रांगोळी तिनं साकारली. याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारी मोडी लिपी आज नष्ट होत जात आहे. मुलांना मोडी लिपीची गोडी लागावी यासाठी चहाचे कप, कॅलेंडर असे अनेक उपक्रम श्रुती करते. २०१६ पासून श्रुती मोडी लिपीच्या प्रसारासाठी काम करत आहे. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थाने जगासमोर आणायचा असेल तर मोडी लिपी शिकली पाहिजे, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली.
तिच्या या कार्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी असं तिच्या वडिलांचं स्वप्न होत. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. ‘त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद आहे’, असं श्रुती गावडे हिने सांगितलं.
