बेकायदेशीर कत्तलखाने बंद करा – गोरक्षक शिवशंकर स्वामी
लोकवार्ता : इंदापूर नगरपरिषदेत बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्यासाठी जाणून बुजून करत असलेल्या दिरंगाईबद्दल गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या सोबत भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.

राज्यात मोठ्याप्रमाणात गोहत्या होत आहे. तसेच इंदापूर नगरपरिषदेला आदेश देऊन त्याठिकाणी असणारे कत्तलखाने बंद करावेत यासाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आयुक्त सिंग यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी गोहत्या रोखण्यासाठी मदत केल्याबद्दल गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार लांडगे यांचे आभार मानले.