सिल्वर ग्रुपचे रेडी पझेशन फेस्टिव्हल ग्राहकांसाठी पर्वणी..
शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व जीएसटी फ्री घरांची संधी.
मोशी । लोकवार्ता-
शहरातील बांधकाम क्षेत्रातील नामांकित सिल्वर ग्रुपच्या वतीने घर किंवा ऑफिसच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी सिल्वर रेडी पझेशन फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले असून दि. १० एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान आयोजित या फेस्टिव्हल चे नुकतेच उदघाटन करण्यात आले. दिवसेंदिवस विकसित होत असणारा चिखली मोशी चऱ्होली हा परिसर राहण्याच्या व व्यवसायाच्या दृष्टीने शहरातील सर्वाधिक पसंत केला जाणारा परिसर आहे. त्यामुळे या भागात स्वतःच घर, ऑफिस किंवा शॉप घेण्याचा विचार करत असलेल्या सर्व ग्राहकांसाठी सिल्वर ग्रुपच्या वतीने एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रेडी पझेशन असलेल्या जाधववाडी येथील सिल्वर सेंट्रल या व्यवसायिक कॉम्प्लेक्समध्ये ऑफिसेस व शॉप्स, त्याचबरोबर आळंदी रोड मोशी येथील सिल्वर होम्स व चिखली येथील सिल्वर नेस्ट या रहिवाशी प्रकल्पामध्ये १ बीएचके व २ बीएचके फ्लॅट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या रेडी पझेशन फेस्टिव्हल च्या निमित्ताने ग्राहकांना शुन्य टक्के स्टॅम्प ड्युटी, शून्य टक्के रजिस्ट्रेशन फी व जीएसटी फ्री फ्लॅट, ऑफिस व शॉप्सचा त्वरित ताबा घेता येणार आहेत. अशी माहिती देत या फेस्टिव्हल चा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर गणेश जाधव यांनी केले.

सिल्वर ग्रुपने आजवर अनेक प्रकल्पांची उभारणी केली असून ग्राहकांच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार गृहप्रकल्प, सर्व सोयीसुविधा व किफायतशीर किंमत या घटकांचा प्रामुख्याने विचार करून देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज सिल्वर ग्रुप पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वात विश्वसनीय ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. भविष्यातही आधुनिकतेची कास धरून नवनवीन प्रकल्पांची उभारणी करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे जाधववाडी सिल्वर सेंट्रल या ठिकाणी आयोजित या फेस्टिवल ला नागरिकांनी भेट द्यावी असे सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर संतोष बारणे यांनी सांगितले. घर किंवा ऑफिस घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या या फेस्टिव्हलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहराच्या विविध भागांतून नागरिक या ठिकाणी फ्लॅट, शॉप किंवा ऑफिसेस पाहण्यासाठी येत आहेत.
सदर रेडी पझेशन फेस्टिव्हलच्या उदघाटन प्रसंगी सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर गणेश जाधव, संतोष बारणे, ऍड. विशाल जाधव, अमोल मारणे व बाळासाहेब जाधव, आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.