मोशी सायकलिस्ट ग्रुप मार्फत आज सकाळी करण्यात आले भाविकांसाठी फराळ वाटप
लोकवार्ता : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीच्या (आळंदी यात्रा) पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेसाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथे लाखो भाविक ( वारकरी संप्रदाय ) महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरून पायी वारी करत येत असतात. प्रत्येक वर्षी मोशी सायकलिस्ट ग्रुप यांच्या वतीने उपस्थित भाविकांना अल्पोपहार वाटप केला जातो.

यावर्षी देखील मोशी सायकलिस्ट ग्रुप मार्फत आज सकाळी ‘हवालदार वस्ती‘ मोशी आळंदी रोड येथे भाविकांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले. मोशी परिसरातील अनेक भाविकांनी या फराळाचा लाभ घेतला.
तसेच मोशी सायकलिस्ट ग्रुप चे सदस्य श्री स्वप्नील भुमकर व श्री राघवेंद्र बेनाडे यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल मोशी सायकलिस्ट ग्रुप तर्फे त्यांना गौरविण्यात आले. हा प्रवास एक आदर्श कार्य असुन तो इतर तरूणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.