प्रा. सोनाली गव्हाणे या भाजपाचा उच्चशिक्षित अन् कार्यक्षम नगरसेविका: आमदार महेश लांडगे
– भोसरीतील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला आमदार गोपिचंद पडळकर यांची उपस्थिती
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात भाजपाचा प्रा. सोनाली गव्हाणे या उच्चशिक्षित अन् कार्यक्षम नगरसेविका आहेत, असे गौरवोद्गार भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी काढले. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यमान नगरसेविका व माजी शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे तसेच भाजपा शहर चिटणीस दत्ता गव्हाणे यांच्यावतीने सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आदिनाथ नगर मैदान, गव्हाणेवस्ती, भोसरी येथे आयोजित केला होता.

यावेळी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेविका भीमाताई फुगे, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, राजेंद्र लांडगे, उद्योजक रोहिदास गाडे, महादेव गव्हाणे, शंकर गव्हाणे, धनराज गव्हाणे, सतीश फुगे, देवा गव्हाणे, शरद जाधव, रंजीत गव्हाणे, नारायण गव्हाणे, नारायण लांडगे, रामदास लांडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात ५१ महिलांना मिळाली पैठणी…
या कार्यक्रमात उत्कृष्ट खेळ असणाऱ्या ५१ महिलांसाठी पैठणी तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्या महिलांना प्रथम क्रमांक टीव्ही ,दुसरा क्रमांक फ्रिज, तिसरा क्रमांक वॉशिंग मशीन, चौथे क्रमांक ओव्हन, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या.