लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी रात्री १२ पर्यंत स्पीकर वाजवण्यास परवानगी; शिंदे सरकारचा निर्णय

लोकवार्ता : “न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.

गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्याची परवानगी असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली.

शिंदे म्हणाले, “पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातून अनेकजण गणेशोत्सव पाहायला पुण्यात येतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मंडळांच्या काही मागण्या होत्या, त्याविषयी मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. यंदा मंडळाना कोणतीही अडचण येणार नाही, जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालतील. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूका काढू. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची योग्य खबरदारी घेतली जाईल.”

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani