अक्षय तृतीया निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला खास आंब्यांची आरास
-अक्षय तृतीया निमित्त खास महाआरतीचे आयोजन.
पुणे । लोकवार्ता-
अक्षय तृतीया निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला खास आंब्यांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अक्षय्य तृतीय सणानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही हा आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. अक्षय्य तृतीय सण आणि आंबा महोत्सवानिमित्त आज मंदिरामध्ये पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेश याग, दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनाना भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

दरवर्षी अक्षय तृतीयेला आंब्यांची आरास केली जाते.हि आरास पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे ते देशभरातील कित्तेक भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. तसेच हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.