लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“कुदळवाडी परिसरात औषध फवारणी करा”

स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली मागणी.

पिंपरी।लोकवार्ता-

कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून परप्रांतीय, चाकरमाने यांचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात भंगारमालाची गोदामे असल्याने अस्वच्छता आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. पालिका प्रशासनाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.


याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुदळवाडी परिसरात डेंगी, अतिसार, मलेरिया, कावीळ यासारखे साथीचे आजार फोफावले असून नागरिक बळी पडत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार माल व्यवसाय असल्याने टायर किंवा तत्सम भांगरमलात पाणी साचत असल्याने कीटक व डासांची उत्पत्ती होत आहे. त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्य वाढत असल्याने तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. कुदळवाडी येथील दुर्गा माता मंदिरासमोरील ड्रेनेजलाइनही तुंबली असल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे .


परिसरात सामान्य नागरिक व चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून आजारपण आणि त्यामागे होणार खर्च न परवडणारा आहे. महापालिका प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तरी प्रशासनच्या वतीने याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करावी. परिसरातील नादुरुस्त ड्रेनेजची तात्काळ दुसृष्टी करावी व हे ड्रेनेज भविष्यात पुन्हा तुंबणार नाही अशी उपाययोजना करावी, डास व कीटकांचा फैलाव रोखण्यासाठी औषध व धूरफवारणी करावी. स्वच्छतेबाबत तसेच साथीच्या आजारांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani