एसटीचा प्रवास महागणार!
दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई |२३ ऑक्टोबर लोकवार्ता-
देशात महागाईमुळे गरिबांचे खूपच नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा पेट्रोल,डिझेल,गॅस,सीएनजी आणि पीएनजी यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता सर्व नागरिकच दिवाळं निघणार हेही तेवढंच खर.. नागरिक महागाईच्या बोझ्याखाली दबत चालला आहे. आता दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार असे संकेत मिळत आहेत. कारण एसटी भाडेवाढीचा (ST fares) प्रस्ताव राज्य सरकराला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

दिवाळीच्या तोंडावर एसटी भाडेवाढ करणार असून 17 टक्के भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होत असून तो भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एसटीच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.