लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय”

सरकारच्या निर्दयतेचा कळस-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

पिंपरी ।लोकवार्ता-

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्दयतेचा कळस गाठला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताण सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना देखील मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपाची भूमिका आहे. आम्ही कोणत्याही श्रेयासाठी या आंदोलनाला साथ देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. कारण त्यांना जनतेच्या मनातलं कळायचं. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला. आपल्या हक्कासाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केलाय.

भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी आम्ही जे आदिवासींना जे लाभ मिळतात, ते धनगर समाज बांधवांना लागू केले. त्यानुसार राज्य सरकारनेसुद्धा ज्या सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. त्याच सवलती एसटी कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या प्रश्नाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani