प्रारूप मतदार यादीवर अन हरकतीसाठी राज्य निवडणूक आयोगाची दोन दिवसांची मुदत वाढ
-३ जुलै पर्यंत अंतिम मुदत वाढ.
पुणे । लोकवार्ता
राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीसाठी नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत 3 जुलैपर्यंत वाढवली आहे .राज्य निवडणूक आयोगाने 3 जुलैपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, असे सांगितले आहे त्यासाठी महापालिकेने पुरेशी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत पुणे महापालिकेकडे आतापर्यंत मतदार यादीतील तफावतींबाबत नागरिकांकडून 968 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात नावे गहाळ असल्याचा अनेकांचा आक्षेप आहे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मते, प्राथमिक तपासणीत प्रारूप मतदार यादीत त्रुटी असल्याचे दिसून आले आहे राज्य निवडणूक आयोग आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी गुरूवारी प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली.

लगतच्या वॉर्डींना नावे हलविण्यावर आक्षेप घेण्यात येणार असल्याचे राजकीय कार्यकर्ते महेश पोकळे यांनी सांगितले आहे ते म्हणाले, की • अशी सर्व नावे त्यांच्या मूळ प्रभागात आहेत याची आम्ही खात्री करू तर महापालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख यशवंत माने म्हणाले, की आम्ही मतदारांना विनंती करतो, की त्यांनी यादी तपासावी आणि काही हरकती असलयास त्या मांडाव्यात अर्जांची छाननी करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभाग कार्यालयात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत आणि आक्षेपात तथ्य आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटीदेखील घेतल्या आहेत छाननीनंतर आठ दिवसांत बदल सादर केले जातील