राज्यातील ९२ नागरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती; निवडणूक आयोगाची घोषणा
लोकवार्ता : राज्यातील ९२ नागरपरिषदांच्या आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणींनंतर आयोगाने हि भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच सर्व ठिकाणी लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आली आहे. तर सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचं आयोगाने सांगितले आहे.

राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायत यांचा निवडणूक कार्यक्रम ८ जुलै ला जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती. १२ जुलै रोजी याबाबत सुनावणी करण्यात आली आहे. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
पुढील सुनावणी १९ जुलै ला होईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ८ जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नागरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. असावं या पत्रात नमूद नाकारण्यात आले आहे.
राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता. येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच स्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडून न्यायालयात करण्यात आली होता. मात्र यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला.
केला होता. त्यानुसार आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला होता.
या ठिकाणी होणार होत्या निवडणुका…
अ वर्गातील ६ नगरपरिषदा –
- भुसावळ
- बारामती
- बार्शी
- जालना
- बीड
- उस्मानाबाद
ब वर्गातील २८ नगरपरिषदा –
मनमाड
सित्नर
येवला
दौंडाईचा- वरवाडे
शिरपूर- वरवाडे
शहादा
अंमळनेर
चाळीसगाव
कोपरगाव
संगमनेर
श्रीरामपूर
चाकण
कराड
फलटण
इस्लामपूर
विटा
अक्कलकोट
पंढरपूर
अकलूज
जयसिंगपूर
कन्नड
पैठण
अबेजोगाई
माजलगाव
परळी-वैजनाथ
अहमदपूर
अंजनगाव- सुर्जी
क वर्गातील नगरपरिषदा –
कुरुंदवाड
मुरगुड
वडगांव
गंगापूर