लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

राज्य सरकारकडून तीनसदस्यीय प्रभागरचना रद्द ;मात्र अद्यापही महापालिकेला कोणताही आदेश नाही

पिंपरी । लोकवार्ता-

राज्य सरकारने तीनसदस्यीय रचना रद्द केली असली तरी, राज्य निवडणूक आयोगाने अद्यापर्यंत महापालिकेला कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे तीनसदस्यीय प्रभागरचनेनुसार मतदारयादी बनविण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रभागरचनेला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभागाची संख्या निश्चित करण्याचा आणि निवडणुकीची तारीख जाहीर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाकडे असलेला अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतला आहे. राज्य सरकारने राजपत्र शुक्रवारी (दि. 11) प्रसिद्ध केले. त्यामुळे महापालिका निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राजपत्र प्रसिद्ध करून 13 दिवस उलटले तरी अद्यापि त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना त्याबाबत काहीच आदेश दिलेला नाही.

महापालिकेच्या निवडणूक विभागास आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. महापालिकेने प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यांवर प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतींवर सुनावणीचा अहवाल 2 मार्चला निवडणूक आयोगास सादर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारच्या राजपत्राबाबत काहीच आदेश मिळाला नसल्याने तीनसदस्यीय प्रभागरचनेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तीनसदस्यीय प्रभागरचनेनुसार मतदारयादी बनविण्याचे काम सध्या महापालिकेने हाती घेतले आहे. प्राथमिक स्तरावर यादीचे काम पूर्ण झाले आहे. यादीतील काही उणिवा दूर करून अंतिम यादी तयार केली जाणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani