लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

MPSC च्या विद्यार्थ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; पुण्यात अलका चौकात MPSC च्या विद्यार्थ्यांनी मांडला ठाण

लोकवार्ता : राज्यातील काही शहरात आज एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू असून MPSC च्या राज्यसेवा परिक्षेच्या नव्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. MPSC राज्य सेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

MPSC

आज सकाळपासून पुण्यातील अलका चौकात MPSC च्या विद्यार्थ्यांनी ठाण मांडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. MPSC च्या राज्यसेवा परिक्षेचा नव्या अभ्यासक्रमावरून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून MPSC च्या राज्यसेवा परिक्षेचा नवा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरातून MPSC च्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू असून जो पर्यंत ही मागणी मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका सध्या MPSC विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani