दिवाळीकाळात १५ दिवसासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद करा
दिवाळीच्या पार्शवभूमीवर चाकण मध्ये होणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी १५ दिवसासाठी जाड वाहने बंद करण्याचं सल्ला डॉ अमोल कोल्हे यांनी दिला.
पिंपरी।लोकवार्ता-
दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन किमान 15 दिवसांसाठी सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलीस प्रशासनाला दिले.

गेल्या काही वर्षापासून चाकण चौकातील वाहतूक कोंडी हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरला आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नानंतर मोशी ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी काल चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.
तसेच तळेगाव आणि मोशी परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व रस्ते दुरुस्तीचे निर्देश पोलीस प्रशासनाकडे दिलेले आहेततसेच वाहतूक नियंत्रांसोबत मनुष्यबळ वाढावे असेही सूचना दिल्या आहे.