देहू नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग
– आमदार शेळके यांची मोर्चेबांधणी
देहू।लोकवार्ता-
देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणुक लवकरच होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पूर्वाश्रमी भाजपचे समर्थक असलेले देहु गावचे माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरत काळोखे,अमोल काळोखे, भाजपा युवक सरचिटणीस प्रफुल्ल टिळेकर आदींनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी देहू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, मावळ तालुका सरचिटणीस बाळासाहेब काळोखे, योगेश जाधव, विशाल परदेशी, योगेश काळोखे, सागर भसे, बापूसाहेब मुसुडगे, रोहित काळोखे, मयूर टिळेकर, गणेश हगवणे, सचिन हगवणे, शिवाजी टिळेकर, विवेक काळोखे, रोहित काळोखे, विशाल झेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांनी देहू शहराच्या सर्वांगीण विकासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. देहू नगरपंचायत करण्यासाठी देखील राज्यपातळीवर आमदार शेळके यांनी विशेष पाठपुरावा केला होता. देहू शहर एक आदर्श तीर्थक्षेत्र बनविण्याच्या दृष्टीने आमदार शेळके नेहमी आग्रही असतात. त्यांच्या विकासात्मक ध्येय धोरणांनी प्रभावित होऊन देहूतील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत-अध्यक्ष प्रकाश हगवणे

आमदार शेळके हे राजकीय डावपेच व परफेक्ट नियोजन करुन भाजपला पुन्हा धोबीपछाड देणार का ? नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणुन विजयी घोडदौड कायम राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.