लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी अडकले युक्रेन मध्ये”

-महाराष्ट्राकडे मागितला मदतीचा हात.. म्हणाले ..आमच्याकडे ४ दिवसाचेच रेशन शिल्लक …

पुणे | लोकवार्ता-

रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आणि युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली. विशेषत: शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत. युक्रेनमधील खारकीव्ह या शहरातील खारकीव्ह विद्यापीठात सुशांत शितोळे शिकत आहे. सुशांतसोबत महाराष्ट्रातील आणखी 8 विद्यार्थी आहेत असं त्याने सांगितलं. यापैकी दोन मुली आहेत.

महत्त्वाचं म्हणजे खारकीव्ह रशियाच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांना खारकीव्ह तात्काळ सोडा असं सांगितलं आहे. “खारकीव्हमध्ये अंतर्गत वाहतूक बंद असल्याने आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही काय करावं कळत नाही,” असंही सुशांत शितोळेने बोलताना सांगितलं. खारकीव्ह विद्यापीठात जवळपास 4,500 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांत केवळ काही शेकडो विद्यार्थी भारतात परतले. बाकी सुमारे 4 हजार विद्यार्थी खारकीव्हमध्येच अडकले आहेत, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
युक्रेनवर रशियाने हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर विद्यापीठातही विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. हवाई वाहतूक बंद असल्याने युक्रेनमध्येच काही दिवस रहावं लागणार याचा अंदाज विद्यार्थ्यांना आला आणि त्यांनी पूर्वतयारी सुरू केली.

सुशांत शितोळे म्हणाला, “आम्ही तातडीने भारतीय दूतावासाला संपर्क केला. त्यानंतर आमच्यापैकी काही मुलं सामान आणण्यासाठी बाहेर पडली. दुकानांबाहेर नागरिकांची मोठी रांग होती. शहर ठप्प होईल या भीतीने सगळ्यांची धावपळ होतेय.”
दुकानातून किराणा माल आणि अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी आम्हाला जवळपास तीन तास लागले, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं. “चार दिवस पुरेल एवढेच सामान आम्ही आणू शकलो. तोपर्यंत काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे,” असं सुशांत शितोळे म्हणाला.

‘भारत सरकारने लवकर मदत करावी’
कीव्ह येथे भारतीय दूतावासाचे कार्यालय आहे. खारकीव्हपासून भारतीय दूतावास जवळपास 500 किमी अंतरावर आहे.
आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. आमचं ईमेलद्वारे संभाषण सुरू आहे. पण इंटरनेटचं कनेक्शन जाण्याची भीती कायम आहे. तसं झाल्यास आम्हाला कोणाशीच संपर्क साधता येणार नाही.
हवाई वाहतूक बंद झाली असली तरी पर्यायी व्यवस्था केली जात आहे अशी माहिती नुकतीच कीव्ह येथील भारतीय दूतावासाने दिली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani