लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मदतीची प्रतीक्षा : आमदार महेश लांडगे

– कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचा ‘सीएसआर’मधून विधायक उपक्रम

खेड । लोकवार्ता-

राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मदतीची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास करुन शाळेत जावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने सामाजिक बांधिलकीतून विधायक पुढाकार घेतला. त्यामुळे ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळाल्यामुळे शिक्षणाच्या वाटेवरील प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

कडूस, ता. खेड येथील रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातकॅनरा रोबेको यांच्या ‘सीएसआर’ फंडाच्या माध्यमातून ५० विद्यार्थ्यीना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे महाराष्ट्र श्रेत्रीय अधिकारी कुलदिप थोरगुले,  सहाय्यक विपणन अधिकारी निखिल पाठक, कांचन ग्रुपचे प्रताप ढमाले, सरपंच निवृती नेहेरे , ग्राम सदस्य लता ढमाले, खळदकर , मुख्याध्यापक अविनाश काळोखे, किसन ढमाले, अशोकराव गारगोटे, प्रकाश कालेकर, किसन गारगोटे, अशोक बंदावणे, सुदाम वारे, बाळासाहेब बोंबले, देविदास नेहेरे, नंदु जाधव तसेच सर्व विद्यार्थ्याचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की,  ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्याना ३ते ४ किमी पायी विद्यालयात येतात ही अडचण ओळखून कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. उद्योग विश्वासातील कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू घटकांना मदतीसाठी पुढे आले पाहिजे. या कार्यक्रमाचे नियोजन रामदास रेटवडे यांनी केले. सूत्रसंचालन  तानाजी कोळेकर तर आभार श्री दतात्रय येवले यांनी केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani