सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना अटक; पती व मुलगा यांच्यावरही गुन्हा दाखल
लोकवार्ता : सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि त्यांचे पती व मुलगा यांना अटक करण्यात आली. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (वय ६०) व पुत्र अभिषेक उमरगेकर (वय २७) अशी अटक केलेल्यां व्यक्तींची नावे आहेत.या प्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल घोलप (वय ४५) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

घोलप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, प्रियांका यांचे ९ महिन्यांपूर्वी अभिषेक उमरगेकर यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजेच संसारोपयोगी साहित्य व फर्निचर कधी आणणार याबाबत तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे.प्रियांका हिन रविवारी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रियांका यांचें यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल हाती आला आहे. या अहवालानुसार त्यांनी आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे.