प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुनील एडके, उपाध्यक्षपदी शिवाजी बोलके
लोकवार्ता : महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या अध्यक्षपदी सुनील एडके तर उपाध्यक्षापदी शिवाजी बोलके यांची निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार झाली. सहायक निबंधक पी.एम. मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली.

या सभेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी सुनील एडके (ता. शिरोळ) यांचे नांव संचालक सुरेश कोळी यांनी सुचविले. त्यास संचालक शिवाजी रोडे पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शिवाजी बोलके यांचे नाव संचालक बाळकृष्ण हळदकर यांनी सुचविले. त्यास संचालिका वर्षा केनवडे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसलेने निवडणूक निर्णय अधिकारी पी. एम. मालगावे यांनी एडके यांची अध्यक्ष व शिवाजी बोलके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष एडके यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे, पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सभेस संचालक अर्जुन पाटील, एस.व्ही. पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब निंबाळकर, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, बाबुराव परीट, गौतम वर्धन, रामदास झेंडे, गजानन कांबळे, पद्मजा मेढे, सुकाणू समितीचे जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, बाजीराव पाटील, ए. के. पाटील, बाळासाहेब पोवार, प्रकाश खोत तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.