“दर्जेदार व उत्तम सेवा यामुळे थोड्याच कालावधीत कंपनीने नावलौकिकता मिळवली”
उत्तम व दर्जेदार सेवा यामुळे कंपनीने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे-खासदार सुनील शेळके.
पिंपरी | लोकवार्ता-
परळी येथी नगरसेवक श्री पवनकुमार मुंडे यांच्या रेडीमिक्स काँक्रीट व्यवसायाच्या प्रथम वर्धापन दिन नुकताच संपन्न झालेला आहे या कार्यक्रमास भाजप नेत्या पंकजा मुंडे त्या सोबतच मावळ विधानसभेचे खासदार सुनील शेळके आणि आमदार महेश लांडगे यांनी देखील हजेरीं लावलेली.
वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसायास निश्चितच वाव आहे. प्रामाणिकपणा व सातत्य ठेवले तर तर सर्व गोष्टी शक्य आहेत . व्हिजन पुढे ठेवून काम केले तर सर्व काही शक्य आहे. उत्तम व दर्जेदार सेवा यामुळे कंपनीने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे. पवनजी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! या शब्दात मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.महिला बालकल्याण मंत्री मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, पर्वती विधानसभेच्या आमदार मा.माधुरीताई मिसाळ, भोसरी विधानसभेचे आमदार श्री. महेशदादा लांडगे, पोलीस उपायुक्त श्री. मंचकराव इप्पर, नगरसेवक परळी श्री. पवनकुमार मुंडे, सो. मीनाक्षीताई पाटील, नगरसेविका सौ.योगिताताई नागरगोजे, नगरसेवक श्री. केशव घोळवे, श्री. सदाशिव खाडे, माजी नगरसेवक श्री. दत्तात्रय खाडे, श्री. अशोक मुंडे, श्री. नीळकंठ चाटे, श्री. भरत गीते, श्री.समीर फाटक, श्री. उपेन छाजेड, श्री. गजानन गावडे, श्री. चेतन्य रायसोनी, श्री. निलेश बोधळे, श्री. बाळासाहेब गिते, श्री. विनायक साठे, श्री. दिपक बांगर, श्री. विनोद सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते.