लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“सुप्रिया सुळे आणि राऊतांचा भन्नाट डान्स”

-आता महाविकास आघाडी तोडुनच दाखवा

मुंबई | लोकवार्ता-

नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्यांनी विरोधकांच्या टीकेचा सामना करणारे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. संजय राऊत यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असून लग्नासाठी निमंत्रण देत आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.दरम्यान लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani