वारंवार वाढत असलेल्या आगीच्या घटनांवर योग्य ती उपाययोजना करा
-शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर यांची मागणी.
चऱ्होली । लोकवार्ता-
वाढत्या उष्णतेमुळे गेल्या काही दिवसात आग लागण्याच्या घटना समोर येत असताना नुकतीच मोशी येथील कचरा डेपो येथे सुद्धा आग लागण्याची घटना घडली आहे.तसेच आगीच्या घटनांमध्ये निवासी इमारतीचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये मालमत्तेची हानी होतेच परंतु अनेकदा जीवित हानीहि होऊ शकते. हॉस्पिटलला आग लागून त्यात रुग्णांचा होरपळून मृत्यू होण्याची घटना तर अगदी नजीकच्या काळातील आहे.मोशी येथील झालेल्या घटनेनंतर योग्य ती उपाययोजना करण्याचे आवाहन कुणाल तापकीर यांनी केले आहे.

काय आहेत कुणाल तापकीर यांच्या मागण्या
च-होली येथे वेगाने लोकसंख्येत वाढ होत असताना आज च-होली येथे एकही अग्निशामक दल नसल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागातील रिक्त जागा त्वरित भराव्या व आग विझविण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री त्यांना उपलब्ध करून देण्यात यावीत.
अनेक इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणेकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही अथवा दुय्यम दर्जाची यंत्रणा वापरली जाते. यासंदर्भात कडक नियम करण्याची गरज आहे.
त्याचबरोबर सर्वच रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चरल आणि ऑक्सीजन ऑडिट करणे बंधनकारक असल्याने याची काटेकोर अंबलबजावणी करावी.
या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्याची मागणी कुणाल तापकीर यांनी केली आहे .