लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

टाळगाव चिखली संतपीठाच्या प्रथम पुस्तिका प्रकाशन सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार

लोकवार्टाता : टाळगाव चिखली संतपीठाच्या प्रथम पुस्तिका प्रकाशन सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार पडला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळगाव चिखली आयोजित प्रथम पुस्तिका अक्षर संस्कार याचे प्रकाशन शनिवारी (दि. ११ जून) भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मोरे बोलत होते.

या कार्यकमाचे अध्यक्षस्थान साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा संतपीठ चे संचालक ह.भ.प. डॉ. सदानंद महाराज मोरे यांनी भुषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा संतपीठचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक तथा उपायुक्त संदीप खोत,उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, दिनकरशास्त्री भुकेले, संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक राजू महाराज ढोरे, अभय टिळक यांसह अभ्यासक समिती, सांस्कृतिक समिती आणि सल्लागार समिती, चिंतन समिती चे सदस्य, संतपीठ शाळेचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हे पुस्तक तयार करण्यासाठी व प्रकाशनासाठी सर्व समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून संतसाहित्याची परंपरा आणि मुल्ये यांचा वारसा आपण विद्यार्थांकडे सुपूर्त करीत आहोत असे आपल्या भाषणात नमुद केले. प्राचार्या डॉ. मृदुला महाजन यांनी संतपीठ शाळेच्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर श्रुती तनपुरे यांची सरस्वती वंदना झाली. दरम्यान रसिका जोशी, डॉ. स्वाती मुळे आणि सहकारी यांनी अत्यंत अप्रतिम असे कथ्थक नृत्य सादर केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहू कामाचा आढावा ; पंतप्रधानाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु…

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani