कर्तव्यंम पुरस्काराचे मानकरी ठरले टीम रे क्रिएशन..राज्यपालांच्या हस्ते भेटला पुरस्कार
-रे क्रिएशन चे सर्वेसर्व अविनाश आदक यांनी स्वीकारला पुरस्कार.
मोशी। लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात व डिजीटल मार्केटींग क्षेत्रात गेल्या काही वर्षात आपला जबरदस्त ठसा उमटविणाऱ्या रे क्रिएशन या कंपनीला आज कर्तव्यम् फौंडेशनच्यावतीने राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते कर्तव्यम् पुरस्कार देवून गौरविण्यात आले.महामहिम राज्यपालांच्या हस्ते रे चे डायरेक्टर अविनाश आदक यांनी हा सन्मान पुरस्कार स्विकारला.

रे क्रीएशन म्हणजे डिजीटल मार्केटींगच्या क्षेत्रात नवलाईचा खजीना, कल्पना शक्तीचा सागर, प्रतिभेचा हिमगीरी घेवून काम करणारी टीम म्हणावी लागेल. भौतीक जगात काम करणाऱ्या लोकांना उच्चकोटीचे मोल संपादून देण्याची किमया आज पिंपरी चिंचवड शहरात केवळ आणि केवळ रे क्रीएशनच करु शकते. अनेकांच्या स्वप्नांना मार्केटच्या जगात स्वतःचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी रे ची टीम ज्या कनल्पनाशक्तीचा अविष्कार करते ती उच्चत्तम कोटीची असते यामुळे क्लायंट आपेक्षेपेक्षा मोठे यशाचे शिखर गाठतो.

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत काय चमत्कार घडवू शकते, याची साक्षात अनुभूती आज होतेय, जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असताना अल्पावधीत आज आपली rey creation थेट राजभवनात दाखल झाली, एवढंच नव्हे तर महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी, आमचे मार्गदर्शक, कर्तव्यम सोशल फाउंडेशन चे सर्वेसर्वा श्री. संतोषभाऊ बारणे सर, प्रसिद्ध लेखक, साहित्यिक श्री. क्रांतीजी महाजन सर अशा दिग्गजांकडून आपल्या रे क्रियेशन परिवाराला कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..! अभिमानास्पद असा हा क्षण.. आपल्या सर्वांचा.. आपल्या सर्वांसाठी..-अविनाश आदक