मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी – चिंचवड येथे पार पडणार
-१९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी – चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली.
पिंपरी । लोकवार्ता
मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि | २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी – चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे | केली..इमराठी पत्रकार परिषदेच्या | अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कृषी महाविद्यालयात आज एस. एम देशमुख यांच्या हस्ते शरद पाबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.. त्यावेळी एस. एम देशमुख बोलत होते. कार्यक्रमास राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
सलग दोन वेळा काही अपरिहार्य कारणास्तव अधिवेशन रद्द करावे लागले होते त्यामुळे राज्यातील पत्रकारांची जी गैरसोय |झाली त्याबद्दल एस. एम. देशमुख यांनी दिलगीरी व्यक्त केली. पिंपरी – चिंचवडचे अधिवेशन ठरलेल्या | तारखेला होईल आणि त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१५ मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये झालेले अधिवेशन अविस्मरणीय झाले. त्याच पद्धतीचे अधिवेशन यावेळेस देखील होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

पत्रकारांसमोरील विविध आव्हानांचा उल्लेख करून शरद पाबळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हे सर्व विषय मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पाबळे यांच्या रूपाने एक खंबीर, संस्थेवर निष्ठा असणारा पत्रकारांच्या प्रश्नांची तळमळ असणारा पत्रकार अध्यक्ष म्हणून लाभल्याने त्यांच्या काळात संस्थेची भरभराट होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली त्यांनी शरद पाबळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शरद पाबळे यांनी सत्काराला उत्तर देताना परिषदेने आपल्या दाखविलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही, राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तन, मन, धनाने प्रयत्न करू असे आश्वासन दिले.