मृतांची आकडेवारी देणारा तो लेख काल्पनिक; केंद्र सरकार
कोविड डेटा व्यवस्थापनाच्या बाबतीत केंद्र सरकार पारदर्शक

लोकवार्ता।प्रतिनिधी
भारतात कोरोना मृतांची आकडेवारी लपवली जात असून देशात मृत्यूच्या अधिकृत आकड्यांपेक्षा पाच ते सात पटीने अधिक मृत्यू झाले आहेत. असे ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रख्यात आंतरराष्ट्रीय मासिकातील एका लेखात म्हटले आहे. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत हा काल्पनिक आकडेवारीवर आधारित असून, ती आकडेवारी निराधार असल्याचे म्हटले आहे.
सरकारने मासिकाच्या लेखात केलेल्या आरोपाचे चार मुद्दामध्ये खंडण केले आहे.
- या लेखाचे विश्लेषण कोणत्याही साथ रोग विज्ञानाच्या पुराव्याशिवाय केवळ भाकितावर आधारित आहे .
- अतिरिक्त मृत्यूचा अंदाज वर्तवण्यासाठी या मासिकाने ज्या अभ्यासाची मदत घेतली ती कोणत्याही देश किंवा प्रदेशाचा मृत्यू दर निश्चित करण्यासाठी प्रमाणित साधने नाहीत.
- मासिकाने दिलेला तथाकथित “पुरावा” हा व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर लाफ्लर यांनी केलेला अभ्यास आहे. पबमेद, रिसर्च गेट इत्यादी वैज्ञानिक डेटाबेसमधील संशोधनाच्या अभ्यासाच्या इंटरनेट शोधामध्ये हा अभ्यास आढळलेला नाही आणि या अभ्यासाची सविस्तर पद्धती मासिकाने दिलेली नाही
- लेखात एक पुरावा दिला आहे जो विमा दाव्याच्या आधारे तेलंगणामध्ये केलेला अभ्यास आहे. अशा अभ्यासाबाबत तज्ज्ञांनी आढावा घेतलेली वैज्ञानिक माहिती उपलब्ध नाही. इतर दोन अभ्यास “प्रश्नम” आणि “सी व्होटर’ या निवडणूक विश्लेषण गटाच्या अभ्यासावर अवलंबून आहेत जे मतदान निकालाचे आयोजन, अंदाज वर्तवणे आणि विश्लेषण करणे यात पारंगत आहेत ते कधीही सार्वजनिक आरोग्य विषयक संशोधनाशी निगडित नव्हते त्याच्या स्वतः च्या निवडणूक विश्लेषण कार्यक्षेत्रात, त्याच्या निवडणूकीच्या निकालांचे अदाज वर्तवण्याच्या पद्धती अनेकदा चुकीच्या आढळल्या आहेत.
कोविड डेटा व्यवस्थापनाच्या बाबतीत केंद्र सरकार पारदर्शक आहे. मे २०२० च्या सुरुवातीला, नोंद केली जाणाऱ्या मृत्यूच्या संख्येत विसंगती येऊ नये यासाठी भारतीय वैद्यकीय सशोधन परिषदेने कोविड -१९ संबंधित मृत्यूच्या योग्य नोंदीसाठी मार्गदर्शन जारी केली. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व मृत्यूच्या अचूक नोंदीसाठी शिफारस केलेल्या आयसीडी -१० कोडनुसार हे मार्गदर्शक असल्याचे सरकारने म्हटले आहे.