लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

जपानच्या रैणकोजी मंदिरातील अस्थी नेताजींच्या नाहीत , पंतप्रधान मोदींनी डीएनए चाचणीचे आदेश द्यावेत !

-सुभाष सिक्रेट पुस्तकाचे लेखक क्रांती महाजन यांचा दावा

पुणे | लोकवार्ता-

जपानच्या रैणकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या अस्थी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नसून त्या अस्थी दुसऱ्या महायुध्दात मृत्यू पावलेला ब्रिटीश सैनिक इचिरो ओकुरा यांच्या आहेत व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाच नाही , असा दावा ‘सुभाष सिक्रेट’ या पुस्तकाचे विश्व कीर्तीमान लेखक क्रांती महाजन यांनी केला आहे . महाराष्ट्राचे राजभवन येथे गव्हर्नमेंट प्रोटोकॉलनुसार नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “सुभाष सिक्रेट” पुस्तकाच्या 21 व्या आवृत्तीमध्ये क्रांती महाजन यांनी हा दावा ठामपणे केला आहे . नेताजींच्या मृत्यूबाबत तत्कालीन मित्र राष्ट्रांनी व कांग्रेस काळातील भारत सरकारने जनतेची कशी दिशाभूल आहे , याबाबत अनेक पुरावे त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहेत . सन 1945 मध्ये नेताजींच्या विमानाला अपघात झाल्यानंतर त्यांना मित्र राष्ट्राच्या सैन्यानी ताब्यात घेतले . त्यानंतर त्यांना सायबेरियातील ओम्सुक शहरात नजरकैदैत ठेवण्यात आले . याशिवाय सन 1945 मध्ये ज्या विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरविण्यात आली होती , ते विमानच सहीसलामत असल्याची नोंद 21 ऑगस्ट , 1945 च्या बँकॉक डॉकेट रजिस्टरमध्ये आहे . पंडीत नेहरूंनी नेताजींना ‘युद्ध अपराधी’ संबोधिले होते व तत्कालीन काँग्रेस सरकारने नेताजींच्या “कथित” विमान अपघात व मृत्यूची शुद्ध चौकशी होवूच दिली नाही , अशी खळबळजनक माहिती या पुस्तकात नमूद करण्यात आली आहे .

या विषयात रशियन संशोधक विनोदाग्रोव्ह यांनी सन 1992 मध्ये लिहिलेल्या लेखाचा दुजोराही देण्यात आला आहे . रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्टॅलीन व सेनापती मोलोटोव्ह यांनी नेताजींना रशियात ठेवायचे की बाहेर पाठवायचे , याबाबत जी चर्चा केली होती त्या चर्चेचा वृतांत मॉस्कोच्या एका साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता . नेताजींच्या “कथित” मृत्यूनंतर अमेरिकन सैन्यदलाचे तेव्हाचे जनरल मॅकआर्थर , भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन , ब्रिटिश गुप्तचर संघटना व जेथे अपघात झाला असे सांगण्यात येते , त्या तैवान सरकारने या घटनेचा स्वतंत्रपणे तपास केला होता .

या सर्वांच्या तपासात नेताजींचा मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली होती . मात्र नेताजी बोस हे जीवंत आहेत , हे सांगणे सोईचे नसल्याने त्या विषयात कुठलीही कागदपत्रे समोर येऊ देण्यात आली नाही . महत्वाचे म्हणजे पंडीत नेहरूंना या सर्व बाबींची माहिती होती व नेताजींच्या “कथित” मृत्यूची भारत सरकारतर्फे अधिकृत चौकशी कारण्याबाबत त्यांची भूमिका अत्यंत उदासीन होती . इतकेच नव्हे तर खुद्द पंडीत नेहरूंनी 22 एप्रिल , 1964 रोजी नेताजींच्या परिवाराला यासंदर्भात केलेला पत्रव्यवहार ( पत्र क्रमांक – 293 पीएमएच / 64) हा जसाच्या तसा “सुभाष सिक्रेट” पुस्तकात दिला आहे , असे लेखक क्रांती महाजन यांचे म्हणणे आहे .

यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आहे . या पार्श्वभूमीवर तरी नेताजींच्या मृत्यूबाबत नेमके सत्य समोर यावे , यासाठी रैणकोजी मंदिरातील अस्थींची डीएनए चाचणी करण्यात यावी , अशी मागणी लेखक क्रांती महाजन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे .

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani