मोशी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील कठड्यांची दुरावस्था
मोशी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता.
मोशी। लोकवार्ता-
राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी ३७ वर्षांपूर्वी हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे येथील शेती जल सिंचनाला पाणी उपलब्ध झाले असून त्यामुळे शेती व्यवसाय समृद्ध झाला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या भागात औद्योगिकीकरण झाले असून रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी भाड्याच्या खोल्या घेऊन राहत आहेत. मोशी पिंपरी चिंचवड महानगर पालिका हंदीत असून नदीपलीकडील चिंबळी गाव आहे. या दोन्ही गावांना जोडणारा हा बंधारा असून या बंधायावरून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करत असतात.
नोकरी, शिक्षणासाठी मोशीला येण्यासाठी चिंबळी (ता. खेड) येथील नागरिक या बंधान्याचा वापर करतात. हा बंधारा वाहतूकीसाठी नुसन पाणी साठवणुकीसाठी आहे परंतु यावर दहा फूट सिमेंट रस्ता असल्याने बंधारा बांधल्यापासून यावरून वाहतूक आहे. आता ही वाहतूक गरजेची बनली असून दोन गावांना कमी वेळात जोडणारा पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याची निवड वाहन चालक करतात. पादचारी देखील या बंधान्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.

बंधाऱ्यावरील रस्ता दहा फुटी व दोन्ही बाजूला नदी असा हा धोकादायक प्रयास नागरिक करत असतात. पूर्वी बाहतूक कमी असल्याने बंधारा ओलांडणे सोपे होते; परंतु आता वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने एखादे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर लोखंडी कठडे उभारल्यास ये-जा करणे सुरक्षित होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने शासनाच्या जलसंपदा विभागाशी समन्वय साधून या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठडे उभरावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.