लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुण्यात उभारणार देशातली पहिली अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी

-उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा.

पुणे | लोकवार्ता-

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्यासाठी  भरीव तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमध्ये 11 हजार कोटी रुपयांची तरतुदीची करण्यात आली आहे . 11 मार्च 1886 रोजी पेनसिल्व्हेनिया वुमन मेडिकल कॉलेजमधुन एमडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी डॉक्टर होत्या आज या गोष्टीला 136 ववर्षे पूर्ण झाली. त्यांना स्मरून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागासाठींच्या तरतुदीची माहिती दिली. पुणे शहराच्या जवळ तीनशे एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडीसिटी उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. ही वैद्यकीय वसाहत सुरु करता असताना त्यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असणार आहे.

या वैद्यकीय वसाहतीत रुग्णालये ,वैद्यकीय संशोधन केंद्र,औषध उत्पादन,वेलनेस , फिजिओ थेरपी केंद्र या गोष्टी उपलब्ध असणारा आहेत. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल असा विश्वासही अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला . प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार १८३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani