इंद्रायणी नदी पात्रात वेगाने वाढणारी जलपर्णी मोठी डोकेदुखी
जलपर्णी पसरली असल्यामुळे नदीला खेळाच्या मैदानाचे स्वरूप आले

लोकवार्ता।प्रतिनिधी
मोशी : तीर्थक्षेत्र देहुकडून मोशी मार्ग आळंदीकडे वाहत असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीवर सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असल्यामुळे नदीला खेळाच्या मैदानाचे स्वरूप आले आहे.

ऐन पावसाळ्यापूर्वी नदीतील जलपर्णी काढण्यात आली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.या जलपर्णीमुळे डेंगी, चिकुणगुणिया या रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. या डासामुळे हिवतापसारख्या रोगांचा प्रादूर्भाव होत असतो. डासांमुळे होणारे डेंगी, चिकनगुणिया सारखे महाभयंकर आजारांमुळे महापालिकेचे दवाखाने दरवर्षी भरतात. नदीपात्रच्या आजुबाजूच्या विहिरींमध्ये हेच मैलामिश्रित पाणी पाझरतं. या विहिरीतील पाणी शेती पिकविण्यासाठी वापर केला जात असून शेतकरी वर्गाकडून हेच रसायन मिश्रीत पाणी शेतीला वापरले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नदी पात्रत वेगाने वाढणारी जलपर्णी ही तर मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. जलपर्णीमुळे होणारे डास व त्यापासून उद्भवणारे नाना प्रकारचे रोग यावर पालिकेचा अमाप पैसा खर्च होत असतो. या ठेकेदारांवर कोणाचा अंकुश दिसून आला नाही. अन्यथा नदी स्वच्छ होऊन वाहती राहिली असती. जमेल तशी जलपर्णी काढायची. काढलेली जलपर्णी नष्ट न करताच नदी शेजारीला काठांवर टाकून द्यायची पावसाळा आला की नदी आपल्याबरोबर शहराने केलेली सर्व घाण पुढे ढकल नेते. मग काय झाले आपले काम. ‘नेमीच येतो पावसाळा’ या प्रमाणो जलपर्णी, डासांचे प्रमाण वाढले, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या की महापालिका प्रशासनाला जाग येते. सध्या जलपर्णीची प्रमाण प्रचंड वाढले असून वारांवर महापालिका प्रशासनाला कळूनही उपाययोजना करण्यात येत नाही. अजून थोडा कालावधी गेला की ऐन पावसाळयाच्या तोंडावर जलपर्णी काढण्याची निविदा काढण्यात येइल व नंतर पहिल्या पावसात तर जलपर्णी काही प्रमाणात वाहून जाईल, असे या भागातील रहिवाशी सांगत आहे. त्यामुळे जलपर्णीचा ठेका कश्यासाठी ?सर्व सामान्य नागरिकांसाठी का राजकीय मंडळींसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

“चिखली भागातील सर्व कंपन्या बंद असल्यामुळे इंद्रायणी पुलाच्या वरच्या भागात स्वच्छ पाणी दिसत आहे. मात्र बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला सर्वत जलपर्णी च दिसते. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे या कंपन्या बंद आहेत. परिणामी पाणी स्वच्छ झाले असल्यामुळे कायमस्वरूपी अश्या दूषित पाण्याची व्यवस्था करण्यात येणे आवश्यक आहे.तसेच कमी प्रमाणात असलेली जलपर्णी त्वरित काढल्यास जलपर्णी चा विळखा होणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.”
इंद्रायणी नदी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. पवने पाठोपाठ इंद्रायणी नदीही प्रदूषित झाली आहे. इंद्रायणीवर आंध्रा व वडिवळे प्रकल्प आहे. विशेष म्हणजे या नदीचं प्रदूषण पिंपरी महापालिकेच्या भागातच जास्त आहे. पुणो जिल्ह्य़ातील लोणावळ्याजवळ नदीचे उगम स्थान आहे . पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडेपासून च:होलीर्पयत इंद्रायणीनदी वाहते.तीर्थक्षेत्र असलेल्या देहू व आळंदीतून वाहणा:या इंद्रायणीकडे तर पहावतच नाही. लाखो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला, तुकाराम बीजेला देहू व आळंदीत जमतात. इंद्रायणीचे ‘तीर्थ’ प्रशान करून मस्तकाला लावतात. . इंद्रायणीचा सर्वाधिक प्रदूषित भाग देहू व आळंदी मधील भाग दिसून येतो.
इंद्रायणीच्या चिखली ते आळंदी या १८ किलोमीटपयर्ंतच्या पात्रमध्ये पसरलेल्या जलपणीर्मुळे नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रमध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडळगाव, वडमुखवाडी, च:होली, आळंदी, मोई आदी परिसरातील मानवी मैला व दूषित सांडपाणी, उद्योगधंद्यातून निर्माण झालेले सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले आहे.याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ,त्याचा नाहक परिणाम सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही नदी प्रदूषनावर उपाय योजना करण्यात पालिकेला आद्यपही यश आले नाही.
जलपर्णीचा ठेका नक्की कोणासाठी ?
नदी पात्रत वेगाने वाढणारी पाणवनस्पती ही तर मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. जलपर्णीमुळे होणारे डास व त्यापासून उद्भवणारे नाना प्रकारचे रोग यावर पालिकेचा अमाप पैसा खर्च होऊ लागला आहे. गेली तीन, चार वर्षे खासगी संस्थेला जलपर्णी काढण्याचा ठेका महापालिकेने दिला. या ठेकेदारांवर कोणाचा अंकुश दिसून आला नाही. अन्यथा नदी स्वच्छ होऊन वाहती राहिली असती. जमेल तशी जलपर्णी काढायची. काढलेली जलपर्णी नष्ट न करताच नदी शेजारीला काठांवर टाकून द्यायची पावसाळा आला की नदी आपल्याबरोबर शहराने केलेली सर्व घाण पुढे ढकल नेते. मग काय झाले आपले काम. ‘नेमीच येतो पावसाळा’ या प्रमाणो जलपर्णी, डासांचे प्रमाण वाढले, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या की महापालिका प्रशासनाला जाग येते. सध्या जलपर्णीची प्रमाण प्रचंड वाढले असून वारांवर महापालिका प्रशासनाला कळूनही उपाययोजना करण्यात येत नाही . अजून थोडा कालावधी गेला की ऐन पावसाळयाच्या तोंडावर जलपर्णी काढण्याची निविदा काढण्यात येइल व नंतर पहिल्या पावसात तर जलपर्णी काही प्रमाणात वाहून जाईल ,असे या भागातील रहिवाशी सांगत आहे . त्यामुळे जलपर्णीचा ठेका कश्यासाठी ?सर्व सामान्य नागरिकांसाठी का राजकीय मंडळींसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.