लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सत्ताधारी भाजपच्या उधळपट्टीमुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळली – संजोग वाघेरे‌ पाटील

– अर्थसंकल्पात ६२८ कोटी रुपयांची घट म्हणजे धोक्याची घंटा  

पिंपरी । लोकवार्ता-

श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे. पंरंतु, आगामी सन २०२२-२३ या अर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून महानगरपालिकेची आर्थिक परस्थिती ढासळली आहे, हे अधोरेखित झाले आहे. पहिल्यांदाच अंदाजपत्रकात ६२७ कोटी रुपयांची मोठी घट झालेली आहे. चुकीचे नियोजन, अनावश्यक कामे आणि वारेमाफ उधळपट्टी करून शहराला आर्थिक संकटाकडे घेऊन जाण्याचं काम महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे‌ पाटील यांनी केली आहे. आगामी सन २०२२-२३ या अर्थिक वर्षाचे एकूण ६ हजार ४९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थायी समितीच्या बैठकीत सादर झाले. या अंदाजपत्रकातून सत्ताधारी आणि प्रशासनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक परस्थिती बिकट होत असल्याचा आरोप करताना संजोग वाघेरे‌ पाटी म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात वाढ होते. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात एकूण ६२७ कोटी रुपयांची घट झालेली आहे. ही बाब महानगरपालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती दर्शविणारी आहे. मागील पाच वर्षे महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे, वारेमाफ उधळपट्टीतून आर्थिक परस्थिती ढासळली आहे. त्याकरिता कोरोना काळात उत्पन्न घटल्याचे कारण दिले जात आहे. परंतु, उत्पन्न घटले असताना खर्चावर मर्यादा आणणे अपेक्षित होते. महापालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांनी खर्च आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट वारेवाप खर्च होत आहे. चुकीच्या अनावश्यक कामांवर कोटी कोटींची उधळपट्टी होते. आवश्यकता गल्ली-बोळात सिमेंट क्रॉकीटचे रस्ते केले जात आहे. यातून रस्त्यावर होणारा खर्चाबरोबर इतरसेवा विस्कळीत होऊन त्या खर्चाचा ताण वाढतो आहे. महापालिकेत सत्ता मिळालेल्या भाजपच्या मंडळींना पुन्हा महापालिकेत आपली सत्ता येणार नाही, ही खात्री आहे. त्यामुळे केवळ मोठ मोठी कामे काढण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. भाजपच्या या कार्यपध्दतीचा भुर्दंड पिंपरी चिंचवड शहराला आणि येथील करदात्यांना सहन करावा लागणार आहे.

– अजितदादांनी घेतली करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी रोखण्याची खबरदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पत सांभाळून विकासकामे करण्याचं आणि जनतेचा पैशाची उधळपट्टी होणार नाही. याची दखल कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली घेतली जात होती. ती खबरदारी भाजपने घेतलेली नाही. त्यांच्या नेत्यांना शहराकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका आणि शहरवासियांना आर्थिक संकटाकडे घेऊन जाण्याचे काम सत्ताधारी म्हणून भाजपने केल्याचे यावरून स्पष्ट होते, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani