लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुण्यातील पहिला दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला

 -नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.

पुणे | लोकवार्ता-

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान वाहतूकसाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल  रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार आहे. शहातील वाहतुकीला यामुळे वेग येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पूल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35  ते 40 हजार वाहने  जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते.

या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani