राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे सुरू
लोकवार्ता : राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे.

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अध्यात्म आणि वारकरी सांप्रदायाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आपल्या टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे. या संतपीठाच्या कामकाजाचा आढावा आज आमदार महेश लांडगे यांनी घेतला. यावेळी संचालक मंडळासोबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
अध्यात्म, वारकरी सांप्रदाय आणि आधुनिक शिक्षण देणारे संतपीठ हा राज्यातील शिक्षण क्षेत्रात आदर्श प्रकल्प होईल, असा विश्वास आहे असं आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक व मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.