गौरव ‘ती’ च्या करुत्वाचा । महिला सक्षमीकरणाचा
-वंदना आल्हाट ठरल्या सकाळच्या वूमेन्स आयडॉल च्या मानकरी.
मोशी| लोकवार्ता –
गौरव ‘ती’ च्या करुत्वाचा । महिला सक्षमीकरणाचा ….महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मोशीच्या वंदना आल्हाट यांना या वर्षीचा सकाळच्या वतीने वूमेन्स आयडॉल च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वंदना आल्हाट या एक सामाजिक कार्यकर्त्या त्याच सोबत उंच माझा झोका या संस्थेच्या अध्यक्षा देखील आहेत.या संस्थेच्या माध्यमातून कित्तेक महिलांच्या रोजगाराचा व आर्थिक प्रश्न सोडवण्याचे काम तसेच अनेक महिलांना उद्योग क्षेत्रातील माहिती देण्याचे काम ते करत असतात.

त्यांच्या याच कार्यासाठी सकाळच्या वतीने काल दि. २९ एप्रिल २०२२ , पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री आयुष प्रसाद तसेच सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणवीस सर व सह संपादक शीतल पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्याचसोबत या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.