शासनाने आर. टी. ई ची थकीत रक्कम शाळांना त्वरित दयावी
मा. श्री अमित गोरखे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना पत्र

लोकवार्ता । प्रतिनिधी
गेल्या ३ वर्षापासून राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने आर. टी. ई ची रक्कम दिली नाही, त्यामुळे संस्थाचालकांना शाळा चालविण्यास अडचण येत आहे. शासन हि थकीत रक्कम देण्यात का दिरंगाई करत आहे ? असा सवाल करत राज्यसरकारने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची आर. टी. ई ची थकीत रक्कम लवकरात लवकर दयावी अशी मागणी प्रदेश सचिव श्री. अमित गोरखे यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांंना पत्राद्वारे केली.
