लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“बंगळुरू येथे घडलेल्या घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद “

-शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे राज्यात पडसाद उमटले आहेत.

मुंबई। लोकवार्ता –

बंगळुरू येथे घडलेल्या घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुंबईत शिवालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमून शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिवल्यापासून जवळ असलेल्या भाजप कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखलं. त्यामुळे पोलिस आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छोट्या छोट्या घटनेनंतर दगडफेक करणं उचित नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. एवढंच नव्हे तर कानडी पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचं समर्थनहि त्यांनी केलं… त्यांच्या या वक्तव्यामुळं हा वाद आणखी चिघळला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगरूळ येथे विटंबना करण्यात आली. त्याचे सीमा भागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेत. बेळगावसह मराठी मुलुखात संतापाची लाट उसळली आहे. कन्नडिगांच्या विरोधात महाराष्ट्र पेटलाय. संतप्त मराठी बांधवांनी बेळगावात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. तर कानडी पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाही करत अत्याचार केले.

मुंबईत शिवसैनिकांनी या घटनेचा नरिमन पॉंईंट येथील शिवालय या शिवसेना पक्ष कार्यालयाजवळ जमून या घटनेचा निषेध केला. येथून जवळ असलेल्या भाजप कार्यालयावर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या निषेधाचे फलक झळकाविले. मात्र, येथील पोलिसांनी त्याना रोखून धरले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani