देहू रस्ता येथील बारणे वस्ती परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी
लोकवार्ता : देहू रस्ता येथील बारणे वस्ती परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सूरु करण्यात आले आहे.

या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या ठिकाणी सिल्वर नाईन, प्रेस्टीन ग्रीन, स्वराज हाउसिंग सोसायटी, शुभ योग सोसायटी, स्वदेशा सोसायटी तसेच अनेक सोसायटीतील हजारो नागरिक या रस्त्यावरून दररोज ये – जा करीत. या नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. यामुळे वारंवार महापालिकेकडे तक्रार करून देखील या रस्त्याचे डांबरीकरण झाले नव्हते.
सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांनी आमदार महेश लांडगे यांना निवेदनाद्वारे या परिसरातील रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली. यावर आमदार महेश लांडगे यांनी तत्काळ पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्याची लवकर डागडूजी करावी, अशी सूचना दिली.
त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्डेसदृश्य रस्ता डांबरीकरण करण्यात आला. निलेश बोराटे यांनी या रस्त्याच्या संदर्भात पाठपुरावा करत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु केल्यामुळे परिसरातील नागरिक आमदार महेश लांडगे व निलेश बोराटे यांच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.