मोशीतील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीतील पार्किंगचा प्रश्न अखेर निकालात…!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीच्या पार्किंगचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पार्किंगच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक राहुल जाधव, नितीन बोऱ्हाडे, उद्योजक संतोष बारणे, चिखली- मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सोसायटी मेंबर संजय गोरड आदी उपस्थित होते.
मोशी येथील प्रिस्टोन ग्रीन सोसायटीच्या पार्किंगचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होता. त्याबाबत नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावर आमदार लांडगे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न निकाली काढला आहे. संबंधित बिल्डरला आमदार लांडगे यांनी कोणाचेही नुकसान न होता प्रश्न सोडविण्याची सुचना दिली होती. प्रत्येक सदनिका धारकांना पार्किंगची सुविधा देण्याचे बिल्डरकडून मान्य करण्यात आले. अखेर पार्किंगच्या सुरूवात झाली आहे.
चिखली-मोशी-चऱ्होली हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले,
सोसायट्यांमयोल समस्यांबाबत फेडरेशनच्या माध्यमातून बैठका आयोजित केल्या जातात. या बैठकीमध्ये पार्किंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे ही समस्या मार्गी लावणयाबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर आमदार महेश लांडगे यांनी प्रिस्टीन ग्रीन सोसायटीतील रहीवाशांचा प्रश्न निकाली काढला आहे.
नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले,
प्रिस्टीन ग्रीन सोसाटीतील रहीवाशांनी पार्किंगच्या समस्येबाबत चर्चा होती. त्यानंतर फेडरेशनच्या माध्यमातून बैठक लावण्यात आली. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्यासोबत बैठक लावण्यात आली. या सोसायटीतील पार्किंगचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
रहिवाशांनी व्यक्त केले समाधान
मोशी येथील प्रिस्टीन ग्रीनच्या ४ इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित इमारतींचे काम चालूच आहे. या ठिकाणी ३८८ सदनिकाधारक आहेत. या सदनिकाधारकाच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. नियमानुसार सदनिकाधारकांना पार्किंगची सोय करायची असते. मात्र प्रिस्टीन ग्रीन मधील सुमारे १९० सदनिकाधारकानांच पार्किंगची सुविधा दिली होती. या मधेही दुचाकी, सायकल पार्किंगची सुविधा नव्हती. त्याबाबत सोसायटी सभासद वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने पार्किंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सोसायटी सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.