बिबट्या सफारी हि जुन्नरमध्येच; अजित पवार यांचं स्पष्टीकरण
-वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु.
पुणे | लोकवार्ता-
जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला हलवलीय हे खोटे आहे असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे . बारामतीचा प्रकल्प 2016 ला मंजुर झालेला आहे. तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण काल मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. विधानसभा अधिवेशनात बिबट्या सफारी केंद्र बारामतीला सूर करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितपवार यांच्या टीका केली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असतांना ते बोलत होते.

आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे. वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु केलंय. वनविभागाचे अधिकारी जुन्नरमध्ये बिबट्या सफारीसाठी कुठला स्पॉट चांगला आहे याची पाहणीसाठी गेले आहेत. ते अधिकारी पुढील आठ्वड्यात त्याबाबत आम्हाला अहवाल सादर करतील. ते झालं की अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन बिबट सफारीचे काम सुरु करण्यात येईल. असेही अजित पवार म्हणाले आहेत.