UAEमध्ये आयपीएल २०२१ चे सामने होणार
२५ दिवस हे सामने खेळवले जाणार

लोकवार्ता।प्रतिनिधी
क्रिकेटप्रेमींसाठी एक खास बातमी आहे. UAEमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहेत. कोरोनामुळे ४ मे रोजी आयपीएलचे ३१ सामने स्थगित करण्यात आले होते. हे उर्वरित ३१ सामने पुन्हा एकदा UAEच्या तीन शहरांमध्ये घेण्याबाबत सध्य़ा नियोजन सुरू आहे.

२५ दिवस तीन शहरांमध्ये होऊ शकतात आयपीएल २०२१ चे सामने १८ किंवा १९ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात.केवळ २५ दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. या दरम्यान ८ डबल एका दिवसात दोन सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना ९ किंवा १० ऑक्टोबरला होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू यामध्ये सहभागी होणार की नाही याबाबत अद्यापही निश्चित माहिती मिळाली नाही. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये आयपीएलसाठी कोणताही बदल करणारी नाही असं स्पष्टीकरण इंग्लंड बोर्डनं दिलं आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल सामने पाहण्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये कोव्हिडचे नियम पाळून परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. ३१ सामने दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. ३० टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. याचं कारण म्हणजे ७० टक्के तिथल्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
इंग्लंड संघाचा बांग्लादेश आणि पाकिस्तान दौऱ्याही याच दरम्यान आहे. शिवाय सप्टेंबरदरम्यान इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत असंही इंग्लंडकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.