हॉटेलात लावलेला औरंगजेबाचा फोटो फोडून धारकऱ्यांनी केला निषेध
लोकवार्ता : श्रीशिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आणि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे ४० दिवस अनन्वित अत्याचार करणाऱ्या मुघल साम्राज्य शासक औरंगजेबाचे आणि त्याचा वंशावलीतील शासकाचे चित्र बिर्याणी बाय किलो (शाखा – ७ वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) या हॉटेल मध्ये लावण्यात आले होते. तोंडी सांगून सुद्धा ते चित्र त्यांनी काढले नाही. अखेर राग अनावर झाल्याने ते चित्र धारकरी बांधवांनी हॉटेलच्या बाहेर आणून फाडून निषेध व्यक्त करत धारकरी पॅटर्न दाखवला आहे.
बिर्याणी बाय किलो या हॉटेलच्या देशभरातील ४० शाखेमध्ये असेच औरंगजेब आणि मुघल प्रशासक यांचे चित्र लावण्यात आले आहे. या कृत्यातून कृर, कुकर्मी, औरंगजेबाबद्दल प्रेम दाखवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांचे अत्यंत अनन्वित हाल करुन मारणारा औरंगजेब देशातील देशद्रोही लोकांना आदर्श वाटत आहे. याचा राग अनावर झाल्याने व धार्मीक भावना दुखावल्यामुळे धारकरी बांधवांनी तो फोटो फाडून निषेध व्यक्त केला आहे.